Gold-Silver Price Today: सोने, चांदी दर वाढले की कमी झाले? घ्या जाणून आजचे भाव
Jewellery | Representative Image (Photo Credits: Pixabay)

सोने (Gold), चांदी (Silver) या धातूंच्या दरांकडे गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे बारकाईने लक्ष असते. त्यात सोने-चांदी दर (Gold-Silver Rate) हे प्रतिदीन बदलते राहात असल्यामुळे या दरांची प्रतिदिन माहिती घेणे अनेकांसाठी नित्याचे होऊन बसते. यात प्रामुख्याने सराफा व्यावसायीक, ग्राहक आणि गुंतवणूकदार आदींचा समावेश होतो. आज (27 मे 2021) सोने, चांदी दर स्थिर आहेत की त्यात काही बदल झाले आहेत याबाबतही अनेकांना उत्सुकता असेल. म्हणूनच आजचे दर ( Gold-Silver Price Today) येथे देत आहोत. घ्या जाणून.

सोने दरात कालच्या तुलनेत आज ढ झाल्याचे पाहायला मिळते. प्राप्त माहितीनुसार सोने दर आज 800 रुपयांनी वाढले आहेत. मुंबई, पुणे यांसारख्या सराफा बाजारांमध्ये 24 कॅरेट सोने प्रती 10 ग्रॅम 47,800 रुपये दराने विकले जात आहे. तर 22 कॅरेटचे सोने प्रति 10 ग्रॅम 46,800 रुपयेदराने विकले जात आहे. सोन्यासोबतच चांदी दरामध्येही जवळपास प्रतिकिलो 1500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या चांदी प्रतिकिलो 72,700 रुपये दराने विक्री होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने बाजारात विशेष अशी हालचा पाहायला मिळत नव्हती. काह अपवाद वगळता सोने, चांदी दर बऱ्यापैकी स्थिर होते. परंतू, आज सोने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. साधारण पाच, सहा दिवसांपूर्वी (20 मे) 22 कॅरेट असलेले 10 ग्रॅम सोने 46,000 रुपये तर 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 47,000 हजार रुपये दराने विकले जात होते. त्यानंतर 21 मे ते 25 मे या कालावधीत सोने दर स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले. आज या दरात अचानक वृद्धी झाली आहे. (हेही वाचा, Price of Petrol & Diesel Today: इंधनाच्या दरात नवी वाढ; मुंबई मध्ये शंभरी नजिक पेट्रोल)

सोने दरात स्थानिक ते आंतरराष्ट्रीय अशा अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. प्रामुख्यने इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोने दर ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन प्रामुख्याने मुंबईतील सोने दर ठरवते. यात स्थानिक आयात कर MCX कमोडिटी मार्केट अशा गोष्टींचा विचार अंतर्भूत असतो.त्यातूनच सोने दर ठरतो.