मंत्रालय व विधिमंडळ मुबंई वेबमीडिया टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्यसंपादक अनिल महाजन यांची निवड
Anil Mahajan | (Photo Credits- File Photo)

ऑनलाईन मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी नुकतीच "वेब मीडिया,टीव्ही जनर्लिस्ट असोसिएशन,विधिमंडळ व मंत्रालय मुंबई" ची मंत्रालयात व विधान भवन येथे स्थापना करण्यात आली असून यासाठी सन २००४ पासून पत्रकारिता क्षेत्रात अथक परिश्रम घेणारे निर्भीड पत्रकारिता करणारे अभ्यासु ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या असोसिएशन मध्ये महाराष्ट्रातील मंत्रालयात व विधीमंडळ येथे नियमियत वृत्तसंकलन करणारे विविध जिल्ह्यातील ऑनलाईन मीडियात काम करणाऱ्या अधिस्वीकृती एकूण ०९ पत्रकारांचा संचालक सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

संचालक सदस्य म्हणून खालील अधिस्वीकृती 9 वेब मीडियाचे मुख्य संपादक पत्रकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(१)अनिल बाबुलाल महाजन :- गर्जा महाराष्ट्र न्युज.( अध्यक्ष)

(२)इरफान अब्दुल रज्जाक शेख :- रफ्तार न्युज.(सदस्य संचालक)

(३)गणेश संपत पुजारी :- गर्जा महाराष्ट्र न्युज.(सदस्य संचालक)

(४)अयाज अहमद मोहसिन दाद खाँ :- इंडिया ३६५ न्युज.

(५)आनंद दिनानाथ शर्मा :- आपतक न्युज.

(६)माऊली राजभाऊ डांगे :- विठाई न्युज.

(७)अभिजित बळवंत पाटील :- आवाज मराठी न्युज.

(८)नरेंद्र दामोदर कसबे :- कळवा न्युज.

(९)प्रमोद बळीराम दांडगव्हाण :- नाशिक न्युज.

दरम्यान, आतापर्यंत ऑनलाईन मीडियासाठी अधिकृत कुठलीही संघटना नसून जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वानुमते महाजन यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.