Nagpur Double Murder: संपूर्ण गाव हादरले! रात्री एकत्र बसून दारू प्यायले; अन् सकाळी रस्त्याच्या कडेला दोघांचे मृतदेह आढळले
Crime | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

दारू प्यायल्यानंतर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांची (Double Murder) हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूर (Nagpur) जवळच्या पाचगाव पासून 2 किमी अंतरावर नागपूर-कुही मार्गावर ही घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण डोंगरगाव हादरून गेले आहे. या प्रकरणी कुही पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आणि आरोपी मित्र आहेत. मात्र, दारू पित असताना त्यांच्यात जुन्या वादावरून चांगलीच बाचाबाची झाली. यातूनच ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

कुणाल सुरेश चरडे (वय, 29) आणि सुशील सुनील बावणे (वय, 24) अशी मृतकांची नावे आहेत. तर, राहुल श्रावणजी लांबट (वय, 27), निशांत प्रशांतराव शाहकर (वय, 23) जागेश्वर संतोषराव दुधनकर (वय, 33) अशी आरोपींची नावे आहेत. कुणाल आणि सुशील हे दोघेही मजूर असून रविवारी सर्वजण दघोरी परिसरात भेटले. त्यानंतर हे पाचही जण एकत्र बसून दारू प्यायले. मात्र, त्यावेळी यांच्यात जुन्या कारणांवरून वाद झाला आहे. हा वाद विकोपाला गेला आणि राहुल, निशांत आणि जागेश्वर यांनी मिळून कुणाल आणि सुशील यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी तसेच सिमेंट काँक्रिटच्या खांबाने डोक्यावर, पाठीवर, पोटावर वार केले. यात या दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांवर खुनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली. हे देखील वाचा- Mumbai: गुंगीचं औषध देऊन 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; तीन जणांवर गुन्हा दाखल

 याआधीही नागपूर येथील कपिल नगर पोलीस स्टेशनच्या उप्पलवाडी परिसरात एका वृद्ध चौकीदाराची हत्या झाली आहे. या घटनेतील आरोपी अद्याप पकडले गेले आहे. तसेच गेल्या आठवण्यात ही हिंगणा, एमआयडीसी, प्रतापनगर परिसरात हत्येच्या घटना घडल्या होत्या. दिवाळीच्या काळात सात दिवसात नागपूर शहर आणि जिल्हा मिळून हत्येच्या सात घटना घडल्या आहेत.