कल्याण: 80 वर्षीय पत्नीला बेदम मारहाण करणा-या गजानन बुवा चिकणकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीचे क्रूर कृत्य आले समोर
Gajananbuva Chikankar (Photo Credits: Viral)

आपल्या 80 वर्षीय पत्नीस बादलीने बेदम मारहाण करणा-या कल्याणमधील 85 वर्षीय गजाननबुवा चिकणकर (Gajananbuva Chikankar) यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (Viral Photos) झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली जोर धरू लागली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक आळंदीला रवाना झाले आणि गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, घरात पाण्याच्या वादावरून गजानन बुवाने आपल्या वयोवृद्ध पत्नीस मारहाण केली. ही घटना 31 मे ची आहे. त्यांच्या 13 वर्षीय नातवाने हा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्यानंतर मिडियानेही हा मुद्दा उचलून धरला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नराधम वृद्ध पतीवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांवर अखेर सामाजिक दबाव वाढल्याने त्यांनी सु मोटोने गजानन बुवा चिकणकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.हेदेखील वाचा- Bharatpur: धक्कादायक! राजस्थानच्या भरतपूर येथे प्रेमी युगुलांवर स्थानिकांचा हल्ला; तरूणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ आला समोर

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धेला भेटून तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र वृद्धेने पती गजानन बुवा चिकणकर याच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचं सांगितलं. अखेर सामाजिक दबाव पाहता पोलिसांनी सु मोटोने मारहाणीचा गुन्हा दाखल केला. गजानन बुवा चिकणकर आळंदीला गेला होता. त्यामुळे पोलिसांचं एक पथक आळंदीला रवाना झालं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.