प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्यः फेसबुक)

नवं वर्षाच्या पार्श्वभूमीवर माशांच्या किंमतीत भयंकर वाढ झाली आहे. त्यामुळे कोळणींच्या उत्पन्नात घट झाली आहे. तर थंडीच्या दिवसात माशांच्या उत्पन्नात 70 टक्क्यांची घसरण झाली आहे.

कोलकाता, ओरिसा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यातून माशांची आयात केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला मासे खाण्याच्या बाबतीत कात्री बसणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. तर माशांच्या किंमतीत दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.

बाजार उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारचे मासे हे विविध राज्यातून मागवल्यामुळे किंमतीत वाढ होत आहे. तर पापलेट, हलवा, रावस, बोंबील आणि सुरमई सारख्या माश्यांच्या पूर्वीपेक्षाच्या किंमतीत 200-300 रुयांनी वाढ करण्यात आली आहे.