पुणे: शिंदेवाडी येथे गॅरेजसमोर आग; 20 ते 25 वाहने जळून खाक
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Fire in Pune: गॅरेजसमोर उभ्या असलेल्या वाहनांना अचानक आग लागल्याने सुमारे 20 ते 25 गाड्या जळून खाक झाल्या. पुणे (Pune) शहरातील शिंदेवाडी ( Shindewadi) येथे सातारा रोड (Satara road) जवळ बुधवारी (20 मार्च) सकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाचे 2 बंब आणि पाण्याचा टॅंकर घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शिंदेवाडी येथील एका गॅरेजसमोर एक खासगी वाहान उभे होते. यापैकी कोणत्यातरी एका वाहनाला आग लागली. अल्पावधीतच ही आग आजूबाजूला पसरल्याने शेजारील वाहनांनीही पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच परिसरात धुराचे लोट पसरु लागले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. वेळ सकाळची असल्याने लोकाची मोठी धावपळ उडाली. (हेही वाचा, चेंबूर येथे रहिवासी इमारतीला आग; 5 जण ठार)

एएनआय ट्विट

दरम्यान, पुणे महापालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.