Fire Erupts at Saket Slum Area in Thane (Photo Credits: ANI)

काल मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास, ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नगरविकास कार्यालयातील एका भागात शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. आता आज, बुधवारी रात्री ठाण्यातील (Thane) साकेत झोपडपट्टी (Saket Slum) भागात  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे (MSEDC) अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी सध्या 1 अग्निशमन इंजिन, एक बचाव वाहन आणि एक पाण्याचा टँकर दाखल झाला आहे.

एएनआय ट्वीट -

या अपघातात कोणतीही जीवितहानी किना कोणी जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण मुंबईतील आयकॉनिक क्रॉफर्ड मार्केटमध्येही अशीच आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी अग्निशमन दलाची पाच इंजिन आणि पाच जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. लेव्हल टू आग परिसरातील चार दुकानांना लागली होती. (हेही वाचा: ठाणे: भिवंडी येथील खोका कंपाउंड परिसरात कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल)

दरम्यान, काल ठाणे महानगरपालिका शहर विकास विभागात लागलेल्या आगीत, स्फोटक फाइल्स भस्मसात करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.