नाशिक: भीमवाडी झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत अनेक झोपड्या जळून खाक
Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

लॉकडाऊनच्या काळात आज नाशिकमधील गंजमाळ परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. भीमवाडीत झोपडपट्टीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत 25 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत अशी माहिती मिळत आहे. या परिसरात एकपाठोपाठ एक 7 सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत मात्र आग विझविण्यास विलंब झाल्याने या जवानांवर दगडफेक केल्याचे वृत्त मिळत आहे.

नाशिकच्या गंजमाळ येथील भीमवाडीत सकाळी साडे नऊच्या सुमारास ही लागली. भीमवाडी झोपडपट्टीत पत्रे आणि लाकडांची घरे असल्याने आगीने भराभर पेट घेतला. त्यातच काही घरांमधील सहा ते सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. Coronavirus Lockdown Relaxed: देशभरातील नोंदणीकृत दुकाने सुरु करण्यास MHA ची परवानगी; लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या

या आगीचे स्वरुप इतके भयानक होते की क्षणार्धात या आगीने पेट घेतला. आगीचे भीषण रुप पाहता क्षणार्धात सर्वांनी घराबाहेर धाव घेतल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र प्रचंड वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ही आग विझवत असताना पत्र्याच्या घरावरून पाय घसरल्याने खाली पडल्याने अग्निशमन दलाचे जवान जगदीश देशमुख हे जखमी झाले. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.