भिवंडीत कापड कारखान्यात भीषण आग
भिवंडी कापड कारखाना आग (फोटो सौजन्य-ANI)

मुंबईत दिवसेंदिवस आगी लागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यात सोमवारी पहाटे भिवंडी (Bhiwandi) येथील सरवली येथील गावातील एका कापड कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे.

कारखान्यात लागलेली आग ही मोठ्या प्रमाणात असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. तर अद्याप लागलेल्या आगीची जास्त माहिती देण्यात येत नाही आहे. ( हेही वाचा- Bhiwandi Fire : भिवंडी येथे लागलेल्या भीषण आगीत 11 गोदामं जळून खाक)

या आगीमुळे सध्या परिसरात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्थानिक लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.