पुणे: शनिवार पेठेत जोशी संकुल बिल्डिंग मध्ये भीषण आग, 25 नागरिकांची सुखरूप सुटका
Pune Fire (Photo credits: Twitter)

पुण्यात शनिवार पेठ परिसरात आज (16 मे) दिवशी भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशामन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र अद्याप आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीची दृश्य 

शनिवार पेठेत प्रभात टॉकिज जवळ असलेल्या रहिवाशी इमारतीमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर टेरेसवर अडकलेल्या सुमारे 25 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामन दलाला यश आलं आहे. या आगीत जीवितहानी न झाल्याचे प्राथमिक वृत्त देण्यात आलं आहे.