ठाण्यातील चरई परिसरात आग; कोणतीही जीवित हानी नाही
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

मुंबईमधील आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. आरे परिसरात लागलेल्या आगीची घटना अजून ताजी असताना मुंबईच्या ठाणे उपनगरातीत चरई परिसरतील इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

ठाण्यातील वंदना सिनेमा रस्त्यावरील शिव आनंद उद्योग संकुलातील दोन गाळ्यांना साधारण दुपारी एक वाजता अचानक आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस दाखल झाले असून, आग नियंत्रणात आली आहे. मात्र या आगीमागील ठोस कारण अजून समजू शकले नाही.