राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचा निर्णय
शालेय विद्यार्थी (प्रातिनिधिक फोटो ) Photo Credits : PTI

राज्यात काही दिवसांपूर्वी कोल्हापूर (Kolkhapur), सांगली (Sangali) भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटना सर्वसामान्यांसह शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा झाला. त्यामुळे आता या राज्यामधील पडलेल्या शाळा नव्याने उभारण्यात येणार असून काही दुरुस्तीची कामे सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याचसोबत काही शैक्षणिक प्रकल्पसुद्धा येत्या काळात राबवण्यात येणार असल्याचा मुद्दा शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

बैठकीदरम्यान पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृ्ततीसुद्धा वाढ करण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पाचवी आणि आठवीमधील शिष्यवृत्तीधारकांना 9 प्रकारामध्ये फक्त 20 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती, तर वार्षिक शिष्यवृत्ती 240 रुपये दिली जात होती. त्याचसोबत दोन प्रकारात 100 रुपये प्रतिमहिनी देण्यात येते. मात्र आता या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय आशिष शेलार यांनी घेतला आहे.(Maharashtra SSC July 2019 Supplementary Result: 10 वी फेरपरीक्षा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; पुरवणी परीक्षेचा निकाल असा पहा ऑनलाईन)

तसेच पडलेल्या शाळांच्या उभारणी आणि दुरुस्तीसाठी 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ बूक बालभारतीच्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचसोबत व्हर्च्युअल क्लासरुप प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद बैठकीत करण्यात आली आहे.