Eknath Shinde: एकनाथ शिंदे गटाकडून समर्थकांकडून ठाणे येथे प्रतिज्ञापत्रे घेण्यावर भर
Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) आमदारांनी केलेल्या बंडानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. बहुतांश आमदारांचा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेला आहे. तर पक्षसंघटना आणि मोजक्या आमदारांचा गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहिला आहे. त्यामुळे शिवसेना आता कोणाची? असा सवाल उत्पन्न झाला आहे. दोन्ही बाजूंनी न्यायालय आणि निवडणूक आयोगात दाद मागितली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटाप्रमाणे समर्थकांकडून प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे गटाला फूटीची धास्ती असल्यामुळेच ही प्रतित्रापत्रे लिहून घेतली जात आहेत का? असा सवाल विचारला जातो आहे.

एकनाथ शिंदे गाटाचे ठाण्यातील माजी महापैर नरेश म्हस्के यांनी आपल्या (शिंदे) समर्थकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहेत. शिवसेना बंडखोरांनी केलेल्या बंडापासूनच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्रे लिहून मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कालच पार पडला. या वाढदिसाची भेट म्हणून शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे भेट द्यावेत असे अवाहन केले होते. शिवसैनिकांनीही ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानत मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्रे लिहून दिली आहेत. (हेही वाचा, Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: 'ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री', एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे बरसले)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही समर्थकांकडून प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली जात आहेत. उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठीच आणि गटातील फूट रोखण्यासाठीच ही प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली जात असल्याचे वृत्त आहे. शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याचे काम आनंद मठ येथे सुरु आहे. आनंद मठ हे आनंद दिघे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या हायातीत ते येथेच राहात.