भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यामागे ईडीचा (ED) ससेमिरा अजूनही कायम आहे. भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. यातच खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांना उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात मंदाकिनी खडसे यांना ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. मंदाकिनी खडसे यांना बुधवार 18 ऑगस्टरोजी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यासह बँकेतील आर्थिक व्यवहारासंबंधात ईडीने माहिती मागितली होती. यापूर्वीही मंदाताई खडसे यांना ईडीकडून समन्स बजावले असता त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. आता मंदाकिनी खडसे चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- Rupali chakankar Criticizes Chandrakant Patil: 'तुमच्या वया इतकी शरद पवारांची संसदीय कारकिर्द आहे' रुपाली चाकणकर चंद्रकांत पाटील यांच्यावर संतापल्या
दरम्यान, पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन व्यवहारप्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना 5 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 8 जुलै रोजी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर पडले होते. त्यावेळी मंदाकिनी खसडे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी त्या ईडी कार्यालयात उपस्थित राहिल्या नव्हत्या.