Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना; स्कॉर्पिओच्या धडकेत चौघांचा मृत्यू; 2 जखमी

छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच एका घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या (Drink and Drive) घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अशाच एका घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. बाळाचे बारसे आटोपून पुण्याला घरी जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. मृणालिनी बेसरकर (38), आशालता पोपळघट (65), अमोघ बेसरकर (6 महिने), दुर्गा सागर गीते (7) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.(हेही वाचा:Nagpur Audi Car Accident: भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीची पाच वाहनांना धडक, दोघांना अटक )

तर, अजय बेसरकर (40), शुभांगिनी गीते (35) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ ही घटना घडली. कृष्णा केरे असे आरोपीचे नाव असून. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स ही नव्हते. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवण्याच्या अपघातात दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले.

विशाल चव्हाण ड्रायव्हरने कृष्णा केरे याला गाडी चालवायचं लायसन नसताना गाडी चालवण्यास दिली. कृष्णा केरे हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.