Rajarshi Shahu Puraskar 2020: डॉ. तात्याराव लहाने यंदाचे 'राजर्षी शाहू पुरस्कार' चे मानकरी
दरम्यान या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रूपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं आहे.
महाराष्ट्रात द्रष्टे राजे म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांचा उल्लेख केला जातो. आज (26 जून) त्यांच्या जयंतीच्या निमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा मानाचा 'राजर्षी शाहू पुरस्कार'(Rajarshi Shahu Puraskar) ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांना जाहीर करण्यात आला आहे. काल राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. लहाने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान दरवर्षी सामाजिक, सांसकृतिक, शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या असामान्य व्यक्तीला हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. Shahu Maharaj Birth Anniversary: समाजसुधारक आणि कोल्हापूरच्या भोसले घराण्याचे राजा शाहू महाराज यांच्याबद्दल याा खास गोष्टी .
1984 सालपासून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून या पुरस्काराची सुरूवात झाली आहे. दरम्यान या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रूपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं आहे. यंदा महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस संकटाचं गंभीर रूप पाहता या पुरस्कार सोहळ्याचे भव्य रूप नसेल. येत्या काही दिवसात डॉ. लहाने यांना खाजगीत प्रत्यक्ष भेट घेऊन हा पुरस्कार दिला जाणार आहे.
दरम्यान डॉ.लहाने यांची ख्याती महाराष्ट्रात बिनटाक्याचे डोळ्याचे ऑपरेशन करणारे अशी आहे. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगावी जाऊन मोफत नेत्र शिबिरं भरवली, अनेकांवर शस्त्रक्रिया केल्या. सध्या ते कोरोना संकट काळातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांच्यापूर्वी हा पुरस्कार शरद पवार, व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव यांना देण्यात आला आहे.