वारणा दूध संघाच्या अध्यक्षपदी डॉ. विनय कोरे यांची निवड
Dr.Vinay Kore (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील दूधाची निर्मिती करणारी प्रसिद्ध कंपनी वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. विनय कोरे (Dr.Vinay Kore)  यांची फेरनिवड झाली आहे. तर ज्येष्ठ संचालक हिंदुराव रंगराव म्हणजेच एच आर जाधव (H R Jadhav) यांची वर्णी लागली आहे. एच आर जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. वारणा सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. यावेळी नवनिर्वाचित संचालक शिवाजीराव कापरे, अभिजीत पाटील, शिवाजीराव जंगम, प्रदिप देशमुख, शिवाजीराव मोरे, राजवर्धन मोहिते, अरुण पाटील, दीपक पाटील, महेंद्र शिंदे, विजयकुमार पाटील उपस्थित होते.

डॉ. विनय कोरे सकाळ ने दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "वारणा दूध संघाची ही ऐतिहासिक निवडणूक झाली. गेल्या 5 वर्षांच्या काळात संघाने नेत्रदीपक कामगिरी केली." हेदेखील वाचा- Jalna: जालना मधील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, साप्ताहिक बाजारपेठा 31 मार्च पर्यंत बंद

दरम्यान डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली संघाचा लौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे उपाध्यक्षपदी निवडून आलेले एच आर जाधव यांनी सांगितले. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत या निवडीचे स्वागत केले. सहाय्यक निवडणूक अधिकारी दवडते, शिवाजी यादव यांनी या निवडणूकीचे काम पाहिले.