Lok Sabha Elections (file Photo)

Dindori Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजप (BJP) उमेदवार भारती पाटील (Bharti Patil), काँग्रेस (Congress) - धनराज महाले (Dhanraj Mahale) तर, वंचित बहुजन आघाडी (VBH) तर्फे बापू केळू बर्डे (Bapu K. Barde) अशी प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघांच्या क्रमवार यादीनुसार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ (Dindori Lok Sabha Constituency) हा शेवटाच म्हणजे 48 व्या क्रमांकाचा मतदारसंघ. सुरुवातीला मालेगाव नावाने परिचित असलेल्या या मतदारसंघातून 2004 मध्ये मालेगाव वगळण्यात आले आणि हा मतदारसंघ दिंडोरी नावाने ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर अदिवासी लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघावर या वेळी कोणाचा झेंडा फडकणार याबाबत उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणूक 2014 ची आकडेवारी

लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल पाहता भाजप उमेदवार हरिशचंद्र चव्हाण यांनी येथून बाजी मारली होती. प्राप्त आकडेवारीनुसार हरिशचंद्र चव्हाण (भाजप) 542784, भारती पवार (राष्ट्रवादी) 295165, हेमंत वाघेरे (कम्युनिस्ट पक्ष) 72599, शरद माळी (बसपा) यांना 17724 इतकी मते मिळाली होती. तर, तब्बल 10897 मतदारांनी नोटा वापरला होता.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

  • नांदगाव विधानसभा मतदारसंघ
  • कळवण विधानसभा मतदारसंघ
  • चांदवड विधानसभा मतदारसंघ
  • येवला विधानसभा मतदारसंघ
  • निफाड विधानसभा मतदारसंघ
  • दिंडोरी विधानसभा मतदारसंघ

मतदारांच्य मनात काय ?

दरम्यान, 2014 च्या निवडणूकीत सर्वाधिक मते मिळवत भाजप उमेदवार निवडूण आला होता. त्या निवडणुकीत भाजपला काँग्रेस विरोधी लाट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारकी चेहऱ्याची साथ मिळाली होती. त्यामुळे बहुमतात असलेली काँग्रेस एका दणक्यात अल्पमतात गेली. तर, इतिहासात पहिल्यांदाच भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही असेच घडले. आता 2019 मध्ये उत्सुकता आहे मतदार राजा आपला कौल कुणाच्या पारड्यात टाकतो. त्यासाठी 23 मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.