धुळे जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या आणखी 55 रुग्णांची भर पडल्याने आकडा दीड हजारांच्या पार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सराकरकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा आहे. याच कारणास्तव कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर धुळ्यात (Dhule) आज दिवसभरात आणखी 55 कोरोनाग्रस्तांची भर पडल्याने आकडा दीड हजारांच्या पार गेला आहे.(धारावीत COVID19 वर मिळवलेले नियंत्रण हे जगासाठी प्रेरणादायी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

धुळ्यात आज सकाळी 94 कोरोनाच्या अहवालांपैकी 88 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात आणखी 17 रुग्णांची भर पडली असल्याने एकूण आकडा 1543 वर पोहचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहे. तसेच कोरोनाच्या विरोधातील लसीबाबत अद्याप संशोधन करण्यात येत आहे.(महाराष्ट्र: ठाण्यातील ग्रामीण भागात COVID19 च्या रुग्णालयात अतिरिक्त 300 बेड्सची उपलब्धता)

दरम्यान, राज्यात एकूणच कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास आकडा 820916 वर पोहचला असून 22123 जणांचा बळी गेला आहे. तर राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबत नागरिकांनी घराबाहेर पडताना अधिक काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु काही ठिकाणी नागरिकांकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.