धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणूक येत्या 30 मार्चला होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
Voting Image used for representational purpose (Photo credits: PTI)

धुळे-नंदुरबार विधानपरिषदेची पोटनिवडणूक येत्या 30 मार्चला होणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. तर माजी आमदार अमरिश पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 30 मार्चला मतदान होणार असून पोटनिवडणूकीचा निकाल 31 मार्चला लागणार आहे. पटेल यांनी गेल्या वर्षात ऑक्टोबर महिन्यात विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निबांळकर यांच्याकडे परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला होता. तर येत्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकजूड होऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अमरिश पटेल यांनी 2019 मध्ये 1 ऑक्टोबरला विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर पटेल यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 पर्यंत होता. तर धुळे-नंदूरबार पोटनिवडणूकीच्या पार्श्वभुमीवर 5 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर 12 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 13 मार्चला उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी, 16 मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 30 मार्चला मतदान होणार असून 31 मार्चला मतदानाचा निकाल जाहिर झाल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया 1 एप्रिला पूर्ण होणार आहे.(मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा आठवडा लागू होणार; शासनाकडून परिपत्रक जारी)

अमरिश पटेल हे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते. तर दुसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला होता. तसेच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अमरिश पटेल यांनी काँग्रेसला रामराम करत भाजप पक्षात प्रवेश केला होता.