प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण देणारा कायदा आज (5 मे) सर्वोच्च न्यायालयाने रद केला आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी एक मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज यावर स्थगितीनंतर रद्दबातल करण्याचा निर्णय आल्यानंतर राज्यात सरकार विरोधी घोषणाबाजीला सुरूवात झाली आहे. विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. नितेश राणे(Nitesh Rane) यांच्यासह मराठा समन्वयक समितीकडूनही या निर्णयानंतर आपल्या प्रतिक्रिया समोर आल्या आहे. (नक्की वाचा: मराठा समाजाला न्याय देण्यासाठी Super Numerary Quota चा सरकारने विचार करावा; कोविड च्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन - खासदार संभाजीराजे यांची प्रतिक्रिया).

देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाचा आजचा निकाल निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये व्यवस्थित बाजू मांडली नसल्याचंही मत व्यक्त केले आहे.

मराठा समन्वय समिती

मराठा समन्वय समिती ने मीडीयाशी बोलताना हाय कोर्टात आरक्षण टिकतं मग सर्वोच्च न्यायलयात का नाही? आणि इतर राज्यात 50% ची मर्यादा ओलांडली मग राज्यातील 52% आरक्षण का टिकू शकत नाही. हे केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाचं केवळ राजकारण होत असल्याची माहिती देत समन्वय समिती ने आंदोलनाची हाक दिली आहे.

नितेश राणे

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाची तुलना व्हायरसशी केली. सर्वोच्च न्यायालयानेच मराठा आरक्षण हा अल्ट्रा व्हायरस असल्याचे म्हटल्याचे त्यांनी सांगिताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे.

दिलीप वळसे पाटील

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी देखील मराठा समाजाचा समावेश एसईबीसी मध्ये चूकीचा असल्याचं म्हटलं आहे. गरीब मराठ्यावर अन्याय झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एससीबीसी अ‍ॅक्ट अंतर्गत ज्यांना शिक्षण आणि नोकरी मध्ये संधी मिळाली आहे ते ग्राह्य धरले जाणार आहेत. पण पुढील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मध्ये हा मराठा आरक्षणचा फायदा मिळणार नसल्याचं म्हटलं आहे. आज न्यायाल्याने गायकवाड समितीचा अहवाल देखील स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं आहे.