Bhiwandi Building Collapse Update: भिवंडीतील (Bhiwandi) वालपाडा परिसरात (Walpada Area) शनिवारी कोसळलेल्या तीन मजली इमारतीतील दुर्घटनेत (Building Collapse) मृतांचा आकडा वाढला असून तो 7 वर पोहोचला आहे. या घटनेत 10 जण जखमी झाले असून अजूनही 8-9 लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (TDRF) यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत आहे.
वर्धमान कंपाऊंडमधील इमारतीच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर एमआरके फूड्सचे कार्यालय आणि गोडाऊन आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट्स आहेत. या इमारतीत काही भाडेकरू कुटुंबे राहत होती. स्लॅबचे बांधकाम दोन मजल्यापर्यंत होते, तर तिसऱ्या मजल्यावर पत्रे बसवण्यात आली होती. शनिवारी दुपारी 1.45 च्या सुमारास इमारतीचा 70 टक्के भाग कोसळला. (हेही वाचा - Shiv Sena Delhi Unit: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दिल्ली युनिटचा शुभारंभ; शहरात विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' राबविण्याची ग्वाही)
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, टीडीआरएफ, भिवंडी-निजामपुरा महानगरपालिका (बीएनएमसी) अग्निशमन दल आणि ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वैद्यकीय मदतीसाठी ठाण्याच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित आहेत, अशी माहिती ठाणे शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. जखमींवर उपचारासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात विशेष वॉर्ड सुरू करण्याचे आदेशही पवार यांनी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी स्वतंत्र कक्षही सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ म्हणाले, आम्ही कोसळलेल्या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील याला ताब्यात घेतले आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम कंत्राटदार कोण होते, याचा शोध सुरू आहे.
#UPDATE | Bhiwandi building collapse: Death toll rises to 7. The rescue operation is still going on for the last 42 hrs: NDRF
— ANI (@ANI) May 1, 2023
भिवंडी-निजामपुरा महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही इमारत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु तीन मजली स्वतंत्र इमारतीवर एक मोठा मोबाइल टॉवर होता. इमारतीतील काही भाडेकरूंनी अतिरिक्त बांधकाम केले आहे आणि आणखी काही खोल्या जोडल्याने इमारतीवर अतिरिक्त भार पडला. इमारत कोसळण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यावरील अतिरिक्त भार असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.