राज्यात आज पहिल्यांदाचं शिवसेनेचे (Shiv Sena) दोन दसरा मेळावे (Dasara Melava) पार पडणार आहेत. ठाकरे गटाचा मेळाव्या नेहमी प्रमाणे शिवतीर्थवर (Shivaji Park) तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी (BKC) मैदानावर पार पडणार आहे. या दोन्ही मेळाव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. राज्यातील विविध शहरातून दोन्ही गटातील कार्यकर्ते मेळाव्यासाठी मुंबईत (Mumbai) हजेरी लावणार आहेत. तरी या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ दिसून येत आहे. तरी नाशिक (Nashik) मधील महिला शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात चांगलीचं झटापट झाली आहे. शहापूरजवळ (Shahapur) शिवसेना नाशिक शहर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅव्हल्स बसमध्ये बसलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडे बघून हातवारे केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
तरी महिला शिवसैनिकांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप दिल्याचा व्हिडीओ (Video) सोशल मिडीयावर (Social Media Viral) चांगलाचं व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडी थांबवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना वाहनातून उतरवले आणि मारहाण केली. दरम्यान, या मारहाण प्रकरणानंतर शहापूर (Shahpur) परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तरी झटापट झालेले हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. (हे ही वाचा:- Shiv Sena Dussehra Rallies: एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांनी अद्याप खुला नसलेल्या समृद्धी द्रुतगती मार्गाचा केला वापर, काँग्रेस आमदाराचा आरोप)
शहापूरजवळ महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात दिला चोप.#EknathShinde #UddhavThackeray #Shivsena pic.twitter.com/mbc0ECqjcw— Maharashtra Times (@mataonline) October 5, 2022
राज्यभरातुन शिंदे समर्थक- ठाकरे समर्थक मुंबईला रवाना झाले आहेत. यंदाचा दसरा मेळावा सर्वांनाच लक्षात राहील असाच होत असून यासाठी दोन्ही गटांकडून गर्दी जमविण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. यासाठी खाजगी बसेससह महामंडळाच्या बसेस बुक करण्यात आली आहेत. तत्याशिवाय रेल्वे तर काही कार्यकर्ते खाजगी वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत.