Coronavirus Updates: महाराष्ट्रात COVID19 चा मृत्यूदर 3.63 टक्क्यांवर पोहचला
Coronavirus | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. तर गेल्या 24 तासात राज्यात 9431 नव्याने कोरोनासंक्रमित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीस एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3,75,799 वर पोहचला आहे. दररोज राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे चिंतेत भर पडत चालली आहे. तसेच भारतातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या असलेल्या राज्यांमध्ये मध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे.(Coronavirus: कोरोना विषाणूमुळे एकाच पोलीस कुटुंबातील तिघांचा मृत्यू)

महाराष्ट्राच्या मेडिकल ऐज्युकेशन अॅन्ड ड्रग्स डिपार्टमेंट यांच्या रिपोर्ट्सनुसार, 267 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 3.63 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात आता पर्यंत एकूण 13,656 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत सुद्धा गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 1101 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोविड19 चा आकडा 1,09,161 वर पोहचला तर पुणे महापालिका क्षेत्रात नव्याने 1921 तर पुण्यात 375 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 2,13,238 जणांची प्रकृती सुधारली असून 1,48,601 ऐवढे अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

आकडेवारीनुसार, 70 टक्के रुग्णांची नोंद ही कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह, उच्चदाब यासारख्या आजाराने झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19,28,333 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 80 टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सौम्य ते अतिसौम्य अशी कोरोची लक्षणे असून फक्त दोन टक्के अतिधोकादायक रुग्णांची संख्या आहे.(मुंबई: चिल्ड्रन होम मधील 268 पैकी 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे तर 30 बालकांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे,नवी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरले आहेत. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेत आहे. तसेच कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध नाही आहे. तरीही डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.