COVID-19 Latest Updates: भारतातील कोरोना संक्रमितांच्या संख्येत 9% घट; पाठिमागील 24 तासात देशभरात  2,022  जणांना संसर्ग
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

देशभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या संखेत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. संक्रमितांच्या आगोदरच्या ताज्या आकडेवारीच्या तुलनेत काल ही संख्या 9% नी घटली आहे. देशभरात रविवारी कोविड संक्रमितांची संख्या 2226 इतकी आढळून आली. या आकडेवारीनुसार देशभरातील कोरोना संक्रमितांची संख्या 4 कोटी, 31 लाख, 38 हजार 393 इतकी झाली आहे. दरम्यान, पाठिमागील 24 तासात देशभरात 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत 5 लाख 24 हजार 459 नागरिकांचे मृत्यू झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांच्या खाली आली आहे. देशभरातील सक्री रुग्णांची संख्या प्रथमच 14,832 इतकी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 0.03% झाली आले. देशातील संक्रितांचा रिकवरी रेट (बरे होण्याचे सरासरी प्रमाण) 98.75 % झाले आहे. पाठिमागील 24 तासात देशबरात सुमारे 2099 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात 4 कोटी, 25 लाख, 99 हजार, 102 लोक उपचार घेऊन कोरोना संक्रमनातून बरे झाले आहेत. (हेही वाचा, दिलासादायक! एप्रिलमध्ये 88 लाख लोकांना मिळाला रोजगार; कोरोना महामारीनंतर एका महिन्यात सर्वाधिक नोकऱ्या मिळाल्या)

देशात दैनंदिन संक्रमितांचा दर 0.69% खाली आला आहे. साप्ताहिक संक्रमनाचा दर 0.49% झाला आहे. आतापर्यंत देशात सुमारे 84.70 कोटी नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. पाठिमागील 24 तासात 2,94,812 नमुने तपासण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्ग 192.38 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.