Rajesh Tope On New Coronavirus Strain: कोरोना व्हायरस नव्या स्ट्रेनचे राज्यात केवळ 8 रुग्ण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु- राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus ) नियंत्रणात आहे. इंग्लंडमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे (New Coronavirus Strain) राज्यात केवळ 8 रुग्ण आहे. त्याबाबतही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. त्यामंळे राज्यातील जनतेने निश्चिंत परंतू सावध राहावे, असे अवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागन झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या कोणालाही कोरोना व्हायरस संक्रमन झाले नाही. राज्यात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचं पूर्णपणे पालन केले जात आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरना व्हायरस लस आणि त्याच्या वितरणाबाबत बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, येत्या 8 जानेवारीला संपूर्ण राज्यभरात कोरोना व्हास लसीकरणाबाबत ड्राय रन होणार आहे. जगभरातील अभ्यासकांच्या अभ्यासातून पुढे आले आहे की, कोरना व्हायरसचा नवा प्रकार अधिक धोकादायक आहे. या परकाराचे संक्रमन होण्याचे प्रमाण आधिपेक्षा जास्त आहे. त्यांमुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही राजेश टोपे म्हणाले. (हेही वाचा, COVID19: पुणे येथे मास्क न घालण्यासह रस्त्यांवर थुंकणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई, 18 कोटींचा दंड वसूल)

पुढे बोलताना टोपे यांनी सांगितले की, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत महाराष्ट्र ज्या पद्धतीने काळजी घेतो आहे. नियमांचे पालन करतो आहे. त्याच पद्धतीने देशातील इतर राज्यांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत येत्या 7 जानेवारीला आमची व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. या चर्चेत आपण या मुद्द्याबाबत बोलणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले आहे. एक काळ असा होता की राज्यात दिवसाला सरासरी 20 ते 21 हजार कोरोना संक्रमित रुग्ण सापडत असत. परंतू सध्या हीच संघ्या दिवसाला दोन ते अडिच हजारांवर पोहोचली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.