Coronavirus Updates: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता बोरिवली, कांदवली मधील काही भागात लॉकडाऊन
Coronavirus (Photo Credits: MAHARASHTRA DGIPR)

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियम शिथील करत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता नागरिक घराबाहेर पडून गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. याच कारणास्तव कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आता कोरोनाचा बोरिवली, कांदीवली मधील काही भागात प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.(मुंबई पोलिस दलाने गमावला अजून एक कोव्हिड योद्धा; Mumbai Police मधील कोरोनामुळे बळींचा आकडा 31!)

नॉर्थ मुंबईत पोलिसांनी मालाड पूर्वेकडे पूर्णपणे लॉकडाऊन लागू केला आहे. त्याचसोबत महापालिकेने बोरिवली, दहीसर आणि कांदिवलीसह एस वॉर्डात ही लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. यामध्ये कांजूरमार्ग याचा सुद्धा समावेश आहे. या परिसरात जीवानावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने बंद राहणार असल्याचे ही सांगण्यात येत आहे.

मलाड मधील आप्पापाडा आणि कोकणीपाडा येथे 8 दिवसांहून अधिक दिवस येथे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. कारण या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा दर सर्वाधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आणखी एक आठवडाभर लॉकडाऊन राहणार असल्याचे अतिरिक्त सीपी दिलीप सावंत यांनी म्हटले आहे.(Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 3827 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर 142 जणांचा मृत्यू)

मालवणी येथील सुद्धा काही भागात खासकरुन एमएचबी कॉलनी, राथोडी, शिवाजी नगर येथे येत्या 20 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. अशा पद्धतीचा लॉकडाऊन बोरिवली पूर्वेतील काजूपाडा, दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा आणि कांदिवली मधील पोईसर येथे लागू करण्यात आला आहे. तर कोरोनाच्या डबलिंग रेट बाबत सहआयुक्त विनय चौबे यांच्यासह अन्य आयपीएस अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक शुक्रवारी पार पडली आहे.