Coronavirus Updates: पालघर येथे कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजार 408 वर पोहचला
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच दरम्यान आता पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजार 408 वर पोहचली आहे. त्याचसोबत वसई, विरार महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 811 इतक्या पालघर ग्रामीण भागातील 1 हजार 582 रुग्णांचा समावेश आहे.(Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 48 तासात 222 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण, तर 3 जणांचा मृत्यू)

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 154 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 5 हजार 56 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. वसई विरार येथे सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा आकडा सुद्धा याच भागातील आहे.(Coronavirus Update: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

दरम्यान, महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 6,875 नवीन रुग्णांची वाढ झाली, यानुसार राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 2,30,599 वर पोहचला आहे. याशिवाय कालच्या दिवसात मृत्यू झालेल्या 219 रुग्णांसहित कोरोना मृतांची संख्या सुद्धा 9,667 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1,27,259 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 93,652 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.