Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत COVID19 च्या आणखी 14 रुग्णांची नव्याने भर पडल्याने आकडा 2282 वर पोहचला
Coronavirus in India (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाणे येथे कोविड19 च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यानंतर आता मुंबईतील धारावीत कोरोनाचा वेग मंदावला आहे. परंतु आज नव्याने 14 कोविडच्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 2282 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.(Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण? पाहा आजचे ताजे अपडेट्स)

धारावीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बळींच्या आकेडवारीत घट झाल्याचे दिसून आले आहे. तसेच धारावीत कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. धारावीत कोरोनाच्या संक्रमणाचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून महापालिकेकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी कोविडसह क्वारंटाइन सेंटरची सुद्धा सोय करण्यात आली आहे. येथील नागरिक दाटीवाटीने राहत असल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अशक्य आहे. परंतु तरीही येथील नागरिकांची वेळोवेळी स्क्रिनिंगच्या माध्यमातून चाचणी करण्यात येत आहे.(मुंबई मध्ये आजपासून संचारबंदी लागू; रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बाहेर पडण्यास मज्जाव)

दरम्यान, मुंबईत कोरोना व्हायसचे एकूण 77658 वर पोहचला असून 4556 जणांचा बळी गेल आहे. तसेच 44170 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने कोविड19 च्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आता मुंबईत कलम 144 लागू करण्यात आला आहे.