Coronavirus in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याबाबत घेतलेला निर्णय प्रभावी ठरत असल्याचे चिन्ह आहे. राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आज (मंगळवार, 8 जून 2021) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात 16,577 कोविड-19 (Covid 19) मुक्त झाले. या आकडेवारीसोबत राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट (Coronavirus Recovery Rate in Maharashtra) 95% इतका वाढला आहे. तसेच, प्रतिदिन संक्रमित रुग्णांचे प्रमाणही बरेच घटले आहे. राज्यात आज 10,891 जण कोरोना संक्रमित आढळले तर 295 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

[Poll ID="null" title="undefined"]दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील मृत्यूदरही चांगलाच घटत असून सध्या तो 1.73% वर आहे. आरोग्य विभागाने माहिती देताना सांगितले आहे की, आतापर्यंत राज्यात 6,69,07,181 नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यापैकी 58,52,891 इतके नमुने पॉझिटीव आढळले. टक्केवारीत हे प्रमाण 15.86% इतके आहे. (हेही वाचा, COVID-19 Vaccination In India Revised Guidelines: भारत सरकार कडून 21 जून पासून सुरू होणार राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम; नवी नियमावली जारी)

एएनआय ट्विट

राज्यातील होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 11,53,147 इतकी आहे. यात महिला, पुरुष, तरुण, वृद्ध अशा सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 6,225 इतकी आहे. तर राज्यात सध्यास्थितीत उपचार घेत असलेल्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1,67,927 इतकी आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, संपूर्ण भारतातून हाती आलेल्या शेवटच्या आकडेवारीनुसार पाठीमागील 24 तासात कोरोनाचे 86,498 रुग्ण आढळले. 1,82,282 जणांना डिस्चार्ज मिळाला. तर 2123 जणांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली. देशभरात आतापर्यंत 2,89,96,473 जणांना कोरोना व्हायरस ससंर्ग झाला. त्यापैकी 2,73,41,462 जण उपचार घेऊन बरे झाले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना संक्रमित 3,51,309 नागरिकांचा मृत्यू झाला. देशात आजघडीला कोरोनावर उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 13,03,702 इतकी आहे. देशात 23,61,98,726 नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.