Coronavirus: मुंबईत दाट वस्तीमधील नागरिकांमध्ये सोशल डिस्टंन्सिंगची समस्या येत असल्याने शाळांमध्ये हलवण्याचा विचार

त्यामुळे दाट वस्तीमधील नागरिकांना आता शाळांमध्ये हलवण्याचा विचार करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले आहे.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारकडून विविध उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. कोरोनाचे संक्रमण अधिक नागरिकांना होऊ नये म्हणून लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घरीच थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तर मुंबईतील ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अशक्य आहे. त्यामुळे दाट वस्तीमधील नागरिकांना आता शाळांमध्ये हलवण्याचा विचार करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील काही ठिकाणी दाट वस्ती असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगचा नियम पाळणे अशक्य होत आहे. तसेच 10x10 खोलीत जवळजवळ 15 माणसे राहतात. त्यामुळेच अशा ठिकाणच्या नागरिकांना शाळेत हलवण्याचा विचार करत आहोत. परिणामी सोशल डिस्टंन्सिंगचा नियमाचे सुद्धा पालन केले जाईल. त्याचसोबत दाट वस्तीतील शौचालय साफ करणे एक आव्हान आहे. यामुळे तर प्रत्येक तासाने येथील शौचालय साफ करण्यासाठी स्पीड जेट पंपाचा वापर करत फायर ब्रिगेडच्या सहाय्याने ते स्वच्छ केले जात आहेत.(Coronavirus: धारावी येथे आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आकडा 17 वर पोहचला)

दरम्यान, कोरोना व्हायरस रुग्ण आढळलेली ठिकाणं, हॉस्पिटल्स सील करण्यात  आलं असून त्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेली वरळी कोळीवाडा, धारावी यांसारखी दाट लोकवस्ती असलेली मुंबईतील ठिकाणी सील करण्यात आली असून ती 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आली आहेत



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif