Coronavirus: मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 36,710; दिवसभरात 1437 नव्या रुग्णांची नोंद
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या आता 36,710 इतकी झाली आहे. आज (29 मे 2020) दिवसभरात 1437 जणांची कोरना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. तर 38 जणांचे मृत्यू झाले, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दरम्यान, मुंबई शहरासोबतच उर्वरती महाराष्ट्रातही कोरोना व्हायरस सक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 2,682 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, मुंबईतील दाटीवाटीचा परसरिसर असलेल्या धारावी झोपडपट्टी परिसरात आज दिवसभरा 41 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे या परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1715 इतकी झाली आहे. या परिसरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे. उल्लेखनिय असे की आज दिवसभरात धारावीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आजघडीला कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 62,228 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 2098 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (हे ही वाचा, धारावीत आज 41 जणांची कोरोनची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 1715 वर पोहचला; मुंबई महापालिकेची माहिती)

एएनआय ट्विट

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राने आतापर्यंत 4 लाख 33 हजार 557 नमुने गोळा केले. त्यातील 62 हजार 228 जण कोरोना पॉझिटव्ह आले. राज्यात आतापर्यंत 5 लाख 35 हजार 467 नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यातील 35 हजार 967 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. यासोबतच राज्यातील कोरना व्हायरस रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.38 इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के इतका आहे.