Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला; आज दिवसभरात तब्बल 1962 रुग्णांची नोंद
Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

गेले काही दिवस मुंबईमध्ये (Mumbai) दररोज कोरोना विषाणूचे (Coronavirus) हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. आज शहरात तब्बल 1962 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 343947 वर पोहोचली आहे. आज कोबिड आजाराचे बरे झालेले रुग्ण 1259 इतके होते व आतापर्यंत 317579 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 13940 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 11531 झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. 6 रुग्ण पुरुष व 1 रुग्ण महिला होते. यातील 7 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर आता 92 टक्के झाला आहे. 7 मार्च ते 13 मार्च 2021 पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.39 टक्के होता. शहरात 13 मार्च 2021 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 35,58,359 इतक्या आहेत. सध्या मुंबईतील कोरोना दुप्पटीचा दर 176 वर आला आहे. सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 31 आहे व सक्रिय सीलबंद इमारती 220 आहेत.

(हेही वाचा: Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन? राज्यात गेल्या 8 दिवसात जवळपास एक लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद)

दरम्यान, महाराष्ट्रात आज 16620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2134072 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून राज्यात सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने कोरोनाचा संसर्ग रोखला. मात्र आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळे, अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केले.