Coronavirus In Maharashtra: मुंबई पाठोपाठ नागपूर, पुणे शहरांतील कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या चिंताजनक
Coronavirus In Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची (Coronavirus In Maharashtra) संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. केवळ शहरच नव्हे तर ग्रामिण महाराष्ट्रातही कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित मोठ्या प्रमाणावर आढळू लागल्यामुळे शासन आणि प्रशासन कठोर पावले ठाकत आहे. प्रामुख्याने मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि नागपूर (Nagpur) या शहरांमध्ये वाढणारी कोविड 19 संक्रमितांची संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज (26 मार्च) झालेल्या बैठकीत येत्या 28 मार्चपासून महाराष्ट्रात रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) टाळायचा असेल तर, नियम पाळा आणि जबाबादारीने वागा असे मंत्री म्हणून लागले आहेत.

एकूण महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज दिवसभरात 36,902 कोरोना रुग्णांची भर पडली. तर 17,019 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. राज्यात आज दिवसभरात 112 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 26,37,735 इतकी झाली आहे. आतापर्यंत 23,00,056 जण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 23,00,056 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर आजघडीला राज्यात 2,82,451 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. (हेही वाचा, Night Curfew In Maharashtra: महाराष्ट्रात 28 मार्चपासून रात्रीची जमावबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय)

मंबई

मुंबई शहरात आज (26 मार्च) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5513 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. कोरोना उपचार घेऊन बरे झालेल्या 1658 जनांआ आज डिस्चार्ज मिळाला. तर एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 47504 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

पुणे

पुणे जिल्हात गेल्या 24 तासात 7,090 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. 3,756 जण उपचार घेऊन बरे झाले तर 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 4,99,784 इतकी आहे. त्यापैकी 4,37,185 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 9,761 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजघडीला पुणे जिल्ह्यात 53,008 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरु आहेत.

नागपूर

नागपूर शहरात गेल्या 24 तासात 4095 कोरोना संक्रमित आढळले. 1943 जण उपचार घेऊन बरे झाले. तर 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांची आतापर्यंतची संख्या 2,11,162 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1,69,407 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 4,819 जणांचा कोरोनामळे मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 36,936 इतकी झाली आहे.