Coronavirus In India: भारतातील कोरोना व्हायरस संकटस्थिती कायम, पाठिमागील 24 तासात 3293 रुग्णांचा मृत्यू, 3,60,960 जणांना संक्रमण
Coronavirus | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या सातत्याने वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेहमीप्रमाणे आजही (बुधवार, 28 एप्रिल) देशभरातील कोरोना (Covid 19) स्थितीबाबत आकडेवारी प्रकाशित केली. या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची गेल्या 24 तासातील संख्या 3,60,960 इतकी आहे. तर याच 24 तासांमध्ये 3293 नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. 1,48,17,371 जण उपचार घेतल्याने बरे झाले. दरम्यान, देशात आजघडीला कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,79,97,267 इतकी झाली आहे. तर देशातील सध्या सक्रीय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 29,78,709 इतकी आहे. आतापर्यत 14,78,27,367 नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

2021 या वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाबाबत येत असलेल्या संख्येवारुन याचा अंदाज सहच येतो. एक एफ्रिलपर्यंत देशात 58,47,932 इतके नवे कोरोना रुग्ण नोंद झाले होते. एप्रिल मध्ये 38,719 इतक्या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या आधी 27 एप्रिल 2021 या दिवशी देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 3,23,144 होती. हिच संख्या 26 एप्रिल रोजी 3,52,991 इतकी, 25 एप्रिल 3,49,691, 24 एप्रिल 3,46,786, इतकी, 23 एप्रिल या दिवशी 3,32,730 इतकी, तर 22 एप्रिल या दिवशी 3,14,835 इतके कोरोना रुग्ण नोंदले गेले. (हेही वाचा, Supreme Court On Covid-19 National Plan: 'अॅक्शन प्लान सांगा! कोरोना संकट राष्ट्रीय आपत्ती, कोर्ट मौन बाळगू शकत नाही'; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे)

कोरोना व्हायरसच्या वेगवेगळ्या म्यूटेशनमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांचया नव्या रुग्णांची भर पडत आहे. दरम्यान, उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. ही दिलसादायक बाब आहे. देशभरात उपचार घेऊन बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 29 लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी (28 एप्रिल) सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 29,78,709 कोविड-19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशातील एक्टीव्ह रुग्णांची संख्या 16.55% इतकी आहे. उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या 82.33% इतकी राहिली आहे. तर आतापर्यंत 1.12% नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.