Coronavirus: नाशिक येथे द्राक्षाला व्यापाऱ्यांकडून 5 रुपये प्रति किलो भाव, कोरोनामुळे उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Nashik Grapes Farmer (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहे. मात्र रेस्टॉरंट, सिनेमागृह, मॉल्स बंद राहणार असल्याने अन्य सेवासुविधा पुरवणाऱ्या उद्योजकांचे नुकसान झाले आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील नाशिक येथील द्राक्ष उत्पादकांना याचा फटका बसला असून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. तर नाशिक (Nashik) येथील द्राक्षाला (Grapes) व्यापाऱ्यांकडून 5 रुपये प्रति किलो भाव दिला जात आहे.

नाशिक येथील द्राक्ष उत्पादकांना बाजारात द्राक्षांचा भाव 5 रुपये किलो व्यापारांकडून दिला जात आहे. राजू नावाच्या द्राक्षाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने असे म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. याच कारणामुळे आम्हाला नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचसोबत व्यापारी अत्यंत कमी भावात द्राक्ष खरेदी करण्याची विचारणा करत असून ते अशक्य आहे. निर्यातदार सुद्धा द्राक्ष खरेदी करण्यासाठी तयार नाही आहेत. आम्हाला आमच्यावर असलेले कर्ज फेडायचे आहे.(Coronavirus: मुंबईत आज नवे 103 कोरोनाबाधित रुग्ण तर 8 जणांचा मृत्यू)

लॉकडाउनच्या काळात विविध स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. तर नागरिकांना आवश्यक वस्तूंसाठी वणवण करावी लागू नये यासाठी राज्य सरकारने विभागीय नोडल अधिका-यांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर रोजंदारीवर काम करणा-यांवर या काळात उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या या अधिका-यांकडून अशा गरजूंना अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.