Coronavirus: सर्व रुग्णांची तपासणी करा, मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णावर 12 तासांनी अंत्यसंस्कार करा; महाराष्ट्र सरकारचे रुग्णालयांना नवे निर्देश
Coronavirus | Photo Credits: Unsplash

कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या देखभाल आणि तपासणीबाबत महाराष्ट्र सरकारने नवे निर्देश राज्यातील रुग्णालयांना दिले आहेत. याबाबतचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केले आहेत. या आदेशात मेहता यांनी म्हटले आहे की, सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, अन्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, खाजगी रुग्णालयांचे प्रभारी अधिकारी या सर्वांनी कोरोनाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची कॅज्युल्टी किंवा स्क्रीनिंग विभागात तत्काळ तपासणी होईल याची दक्षता घ्यावी. त्यासोबतच रुग्णाला आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करावे. रुग्णालाय योग्य उपचार मळण्यासाठी त्याला व्यवस्था असलेल्या ठिकाणी स्थानांतरित करावे.

रुग्णालयात आलेला कोणताही रुग्ण तपासणी केल्याशिवाय परत पाठवू नये. खास करुन कोरोना रुगणाची पूर्ण तपासणी केल्याशिवाय, त्याच्यावर आवश्यक चाचण्या करून योग्य ती खबरदारी घेतल्याशिवाय त्याला परत पाठवू नये. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यावर त्याला सुट्टी देताना आरोग्यसेवा केंद्रांच्या संचालकांनी खबरदारी घ्यावी. त्यासाठी कोरोना तपासणीच्या मानकानुसार रुग्णांच्या स्क्रीनिंग, स्थानांतरण आणि त्यांना दाखल करून घेणे व सुटी देणे याची यंत्रणा तयार ठेवण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

एएनआय ट्विट

दरम्यान, रुग्णालयाती वाढती संख्या, गर्दी विचारात घेऊन रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्याबाबत काळजी घ्यावी. काही रुग्ण खासगी रुग्णालयात असतात. त्यांना विलगीकरणासाठी घरी पाठवत असताना त्यांच्या हातावर विलगिकरण शिक्का मारावा. जेणेकरुन हे रुग्ण ओळखता येणे सोपे जाईल. (हेही वाचा, Coronavirus Lockdown मुळे देशातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी यांना मूळ ठिकाणी परतण्याची परवानगी; महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती)

COVID -19 Maharashtra Update: महाराष्ट्रात एका दिवसात ५९७ नवीन रुग्ण; ३२ जणांचा मृत्यु - Watch Video

एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या रुग्णाचे तपासणी रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहावी. हे रिपोर्ट आल्यावर साधारण या रुग्णाच्या मृत्यूनंतर 12 तासांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करावेत. रुग्णालयातून त्याचे शव 30 मिनिटांच्या आत हटवावेत. त्याबाबतची काळजी रुग्णालया प्रशासनाने घ्यावी असेही या निर्देशात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारचे हे निर्देश सरकारी आणि खासगी रुग्णालायांना लागू असतील.