Coronavirus: माणूसकी सोडू नका! पुणे-मुंबई, विदेशातून आलेल्या नागरिकांकडे संशयाने पाहू नका - राजेश टोपे
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

बाहेरच्या देशांतून आले किंवा पुणे-मुंबई येथून आले तरीही ते आपले नागरिकच आहेत. त्यामुळे बाहेरुन गावात आलेल्या नागरिकांकडे संशयाने पाहू नका. ते आपलेच आहेत. गरज भासली तर त्यांना मदत करा. कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्ण पूर्ण बरे होत आहेत. ही समाधानाची गोष्ट आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. कोरोना बरा होऊ शकतो. राज्यातील 106 रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर आहे. उर्वरीतांपैकी 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो असेही टोपे म्हणाले.

कोरना व्हायरस बाधित दोन रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. बाकिच्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्या रुग्णांची आरोग्य प्रशासन काळजी घेत आहे. रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, परिचारीका आणि कर्मचारी वर्ग त्यांच्यावर बारिक नजर ठेऊन आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. (हेही वाचा, 'तुमचे असणे आमच्यासाठी गरजेचे आहे' असे ट्विट करत संजय राऊतांनी नागरिकांना दिला भावनिक संदेश)

ट्विट

राज्यातील काही डॉक्टर्सनी ओपीडी बंद ठेवल्याचेही पुढे आले आहे. पण, असे करणे योग्य नाही. राज्यातील कोणत्याही डॉक्टरे आपले दवाखने अजितबात बंद ठेऊ नयेत. कोरोना व्हायरस बाधित व्यक्तींशी प्रेमाणे आणि मानूसकीने वागावे असे अवाहनही राजेश टोपे यांनी या वेळी केले. महाराष्ट्रात कोरना व्हायरस बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा तीन इतका आहे. तर महाराष्ट्रात आढळलेला फिलिपाईन्सचा नागरिक कोरोना निगेटिव्ह आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी या वेळी दिली.