Ajit Pawar On Corona Vaccine: अजित पवार यांनी कोरोना लस घेतली पण फोटो नाही काढला, कारण ऐकूण सर्वांनाच आले हसू
Ajit Pawar | (File Photo)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी कोरोना लस (Corona Vaccine) घेतली. ही लस घेतानाचे फोटोही अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोरोना लस घेतली. अजित पवार (Ajit Pawar ) यांनी मात्र कोरोना लस घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. त्यामुळे अजित पवार यांनी कोरोना लस (Ajit Pawar On Corona Vaccine) घेतली की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. पुण्यातील एका पत्रकाराने शेवटी अजित पवार यांनाच याबाबत विचारले. पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवार यांनी दिलेले उत्तर ऐकून उपस्थितांपैकी सर्वच जण हसू लागले.

त्याचे झाले असे, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (26 मार्च) आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील सर्व लोकप्रितिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात कोरोना स्थितीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी एका पत्रकाराने दादा तुम्ही कोरोना लस घेतली का? असा सवाल विचारला. यावर अजित पवार म्हणाले 'होय रे बाबा! घेतलीय मी कोरोनाची लस. फक्त इतरांसाराखा फोटो नाही काढला. मला काढायचाच नव्हता फोटो. मला तसली नौटंकी आवडत नाही', असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांनी या वेळी एक मिश्कील टोलाही लगावला. अजित पवार म्हणाले, 'कोरोना लस घेताना मी जर फोटो काढला असता आणि इतरांसारखा तो टाकला असतातर जे लस घेणारे आहेत त्यांनीही लस घेतली नसती.' अजित पवार यांच्या या मिश्कील विनोदावर उपस्थितांनी उत्स्फूर्थ दाद दिली. (हेही वाचा, Covid 19 in Pune: पुणे शहरात नागरिकांनी नियमावलीचं पालन करणं न केल्यास 2 एप्रिल नंतर नाईलास्तव 'लॉकडाऊन' सारखा कडक निर्णय घ्यावा लागेल; अजित पवारांचा इशारा)

दरम्यान, या वेळी अजित पावर यांनी गंभीर इशाराही दिला. अजित पवार म्हणाले, कोरोना व्हायरस झपाट्याने वाढतो आहे. सर्व नियम पाळणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. नागरिकांनी जर नियमांचे पालन केले नाही. तर नाईलाजाने लॉकडाऊन लावावा लागेल. 2 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम आहे. अन्यथा नाईलाजाने हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे अजित पवार म्हणाले.