Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सक्रिय 155 रुग्ण तर 34 जणांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राजेश टोपे (Photo Credits-ANI)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे रुग्णांच्या संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र सरकारकडून देशावर आलेल्या महासंकटला पळवून लावण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउनचे आदेश देण्यासोबत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करत आहेत. ऐवढेच नाही तर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे नागरिकांना कोरोनासंबंधित माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. तर ताज्या अपडेटनुसार, आतापर्यंत राज्यात 34 जणांना डिस्चार्ज आणि कोरोना व्हायरसचे सक्रिया रुग्ण 155  असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजेश टोपे यांनी कोरोनासंबंधित अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबईतील 12, पुणे मधील 15, नागपूर येथील 01, औरंगाबाद येथील 03 असे एकूण 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात आता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 155 वर पोहचल्याचे ही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 190 च्या पार गेला होता. मात्र राजेश टोपे यांनी 34 जणांचा डिस्चार्ज दिल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून येत आहे.(Coronavirus: राज्यात कोरोनाचा 7 वा बळी; मुंबईमध्ये 40 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू)

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा नागरिकांना गर्दी करु नका मात्र सरकारला सहकार्य असे म्हटले आहे. तसेच नागरिकांनी सरकारला कठोर निर्णय घेण्यास पाडू नये असे आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील कामगार, मजूरांना विनंती आहे की, आपण कुठलेही असा. जिथे आहात तिथेच थांबा. खास करुन परराज्यातील मजूरांनीही राज्य सोडण्याची आवश्यकता नाही. आम्ही आपल्या जेवणाची आणि भोजनाची व्यवस्था करत असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.