Lockdown: लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलिसांवर हल्ल्याच्या 254 घटना, 86 जखमी, 833 जणांना अटक- अनिल देशमुख

लॉकडाऊन (Lockdown) काळात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) कर्मचाऱ्याऱ्यांवर हल्ल्याच्या आतापर्यंत 254 घटना घडल्या. यात 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर, 833 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी दिली आहे. यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांवर हल्ल्याच्याही 40 घटना घडल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन करत सोशल डिस्टंन्सींग पाळावे यासाठी पोलीस लक्ष देत आहेत. अशा वेळी काही नागरिक व पोलीस कर्मचारी यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याच्या आणि पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत.

दरम्यान, 100 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन मदत मागणाऱ्या नागरिकांची संख्याही मठ्या प्रमाणावर वाढली आहे. लॉकडाऊन काळात आतापर्यंत तब्बल 96,697 इतके फोन कॉल्स या क्रमांकावर आले आहेत. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये 28 मे 2020 अखेर 1,16,670 गुन्हे दाखल केले आहेत. क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकट्या मुंबई शहरात 706 गुन्हे दाखल आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्र पोलिस कर्मचार्‍यांना COVID 19 ची लागण होण्याच्या संख्येत मोठी वाढ; 24 तासांत 131 जणांना कोरोनाची लागण!)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

लॉकडाऊन काळात बेकायदेशीर वाहतूक केल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 1,323 गुन्हे दाखल केले आहेत. 23,314 जणांना अटक केली आहे. 75,813 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. तर तब्बल 5,75,30,267 रुपये इतका दंड आकारला आहे, असे वृत्त गृहमंत्रालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.