Coronavirus: रत्नागिरी येथे 34 पैकी 21 कोरोनाबाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह, आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा
Coronavirus in India | Representational Image (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर जरी पोहचली असली तरीही रत्नागिरी येथील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रत्नागिरीत 34 पैकी 21 जणांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. मात्र 13 जणांवर अद्याप कोरोनाच्या विरोधात रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे ही सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या पाहत सरकारकडून संचारबंदी आणि जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पोलिसांकडून लॉकडाउनच्या परिस्थितीत नाकाबंदी करण्यात येत असून विनाकरण फिराणाऱ्यांना चोप दिला जात आहे. राज्यात जमावबंदी सुद्ध लागू करण्यात आल्याने नागरिकांनी गर्दी केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करु असा इशारा सुद्धा दिला जात आहे.(मुंबई: Lockdown च्या काळातही अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे जेवण आणि पाण्याच्या बॉटल्सचे वाटप)

 तर कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना गावाकडे जाण्याचा मार्ग पकडला होता. परिणामी रेल्वे स्थानकात होणारी गर्दी पाहता रेल्वे सेवा पूर्णपणे येत्या 14 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा सर्वाधिक आकडा हा महाराष्ट्रात असून नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.