Coronavirus: कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांत 1 हजार 638 रुग्ण कोरोनामुक्त
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले असताना कोल्हापूरकरांना (Kolhapur) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांत 1 हजार 638 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी रात्री 8.30 वाजेपर्यंत 1 हजार 295 तर, गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 679 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तात्पूर्ता सुटकेचा श्वास घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारकडून अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. तसेच लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कोरोनामुक्त करणार, असा विश्वासही राज्य शासनाने दाखवला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: कोरोना विषाणूमुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा मृत्यू

ट्वीट-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 39 हजार 297 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 हजार 390 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 10 हजार 318 जणांनी कोरोनावर मात केली आहे.