Mumbai Police: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट; मुंबई वाहतूक पोलिसांच्या फोनवर मेसेज

मुंबई पोलिसांच्या व्हॉस्टअॅप हेल्पलाईन क्रमांकावर धमक्यांचे हे संदेश आल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमक्यांचे सुमारे 7 ऑडिओ क्लिप आल्याची माहिती आहे.

PM Narendra Modi (PC - ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा ऑडिओ संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Traffic Police) हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाला आहे. मुंबई पोलिसांच्या व्हॉस्टअॅप हेल्पलाईन क्रमांकावर धमक्यांचे हे संदेश आल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमक्यांचे सुमारे 7 ऑडिओ क्लिप आल्याची माहिती आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींनी पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचे म्हटले आहे. या दोघांचे पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड डॉन दावा इब्राहिमशी संबंध असल्याचे समजते. पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे. धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधला जात आहे.

वाहतूक विभागाला धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी वरळी पोलिसांना कळवले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ज्या क्रमांकावरून त्यांना धमक्या आल्या त्या क्रमांकाचा वापरकर्ता आयडी ट्रॅक करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरु केली आहे.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींना मारण्याबाबतच्या धमक्या वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर मुंबई क्राईम ब्रँच सावध झाली आहे. धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या दोन लोकांची नावेही घेतली आहेत.त्यामुळे त्या दिशेनेही तपासकार्य सुरु झाले आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये दाऊदचा हस्तक मुस्तफा अहमद आणि नवाज या दोन साथीदारांच्या नावांचा उल्लेख आहे. रिपोर्ट्सनुसार धमकी देणारी ऑडिओ क्लिप हिंदीत आहे. दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या दोन साथीदारांना पंतप्रधान मोदींच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यत्रणा अलर्टवर आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना पंतप्रधानांवर हलल्ला करण्याबाबतचा असाच धमकीचा फोन आला होता. एका फेक कॉलमध्ये, एका व्यक्तीने पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केला आणि दावा केला की पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट रचला जात आहे. या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर बॉम्ब पेरण्यात येणार असल्याचेही फोन करणाऱ्या अज्ञाताने हेल्पलाइन क्रमांकावर सांगितले. (हेही वाचा, पंडित नेहरू यांना फॉलो करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पहा त्याचा पुरावा)

पुणे पोलिसांना आलेल्या धमकीचा कसून तपास केल्यानंतर पोलिसांनी एका 38 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. ज्याने धमकीचा फोन केला होता. पोलीस तासात पुढे आले की, संबंधित व्यक्ती हा नैराश्येने ग्रासला होता. त्यातच त्याने फोन करण्याचे कृत्य केले.

दरम्यान, आताही आलेला फोन नेमका कुणी केला याबाबत मुंबई पोलीस तपास करत आहेत. फोन करणारा व्यक्ती परदेशातील आहे की महाराष्ट्र किंवा भारतात त्याचे धागेदोरे आहेत. हा फेक कॉल आहे की त्यात काही तथ्य आहे, अशा विविध दृष्टीकोणातून या फोन कॉल्सचा तपास केला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif