CM Uddhav Thackeray-PM Modi Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
Pm Narendra Modi, CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Uddhav Thackeray-PM Modi Meet: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळी सुद्धा तेथे उपस्थितीत राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे आणि सीताराम कुंटे हे सुद्धा असणार आहेत. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच यांच्या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाऊ शकते याबद्दल सुद्धा अंदाज बांधले जात आहेत.(Maharashtra Unlock: तिसऱ्या लाटेचा धोका कायम; गर्दी टाळा, नियम मोडू नका, शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा- मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची प्रथमच प्रत्यक्षात भेट होणार आहे. तर सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यावर मोंदीशी काय बोलणार हे सुद्धा पाहणे महत्वाचे असणार आहे. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला मराठा आरक्षण कायदा यावर ही काही तोडगा निघणार का? असा ही प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. ऐवढेच नाही ओबीसी आरक्षणासह राज्याला तौक्ते चक्रीवादळामुळे बसलेल्या फटक्यासंदर्भातील मुद्द्यावर ही चर्चा करु शकतात. या सर्व गोष्टी पाहता नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मोदी यांच्या भेटीपूर्वी उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्यासोबत मराठा आरक्षणांसदर्भात बैठक पार पडल्याचे  महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरगाव चौपाटी येथे पोलिसांच्या 10 Terrain Vehicles ला दाखवला हिरवा झेंडा)

Tweet:

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच शिष्टमंडळींसोबत बैठकीनंतर खासगी मध्ये उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्या मध्ये बातचीत होऊ शकते. तसेच दिलीप वळसे पाटील यांनी जीएसटी परतावा, आर्थिक मदत या मुद्द्यावर ही चर्चा होईल असे म्हटले होते.