Mobile Covid-19 Labs: मुंबईत कोविड-19 चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले लोकार्पण
CM Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

कोरोना बाधितांच्या संख्येत सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली होती. विविध योजना, अभियान यांच्यामार्फत कोविड-19 (Covid-19) संसर्गावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आता कोरोनाग्रस्तांचा आकडा आटोक्यात आला असला तरी मुंबईत कोविड-19 च्या फिरत्या प्रयोगशाळा लॉन्च करण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एनएबीएल ॲक्रिडेटेड आणि आयसीएमआरची (ICMR) मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले. गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात  या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

सध्या मुंबईत सुरु करण्यात आलेली ही सेवा लवकरच राज्यभरात उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल त्यांनी स्पाईस हेल्थचे त्यांनी आभारही मानले. (केरळ मधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड-19 RT-PCR टेस्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय)

CMO Maharashtra Tweet:

दरम्यान, फिरत्या प्रयोगशाळेत केलेल्या कोविड-19 लसीचा अहवाल अवघ्या 24 तासांत उपलब्ध होईल. तसंच यासाठी केवळ 499 रुपये मोजावे लागतील अशी माहिती आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

बुधवारच्या अपडेटनुसार सध्या राज्यात 35,633 सक्रीय रुग्ण असून 19,63,946 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 95.7% इतका झाला आहे.