CM Uddhav Thackeray यांची यात्रा, दहीहंडी सेलिब्रेशन करणार्यांना टोला; सर्वसामान्यांचे जीव धोक्यात टाकून आयोजन 'दुर्देवी'!
आंदोलनकर्त्यांना हे पत्र दाखवलं पाहिजे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात आज दहिकाला सणावर कोरोनाचं सावट असल्याने पूर्वीप्रमाणे 'गोविंदा'चा थरार अनुभवता न आल्याने अनेकांच्या जीवाला चूटपूट लागली आहे. महाराष्ट्रात मनसे (MNS) आणि भाजपा (BJP) कडून राज्य सरकारचे सारे नियम धाब्यावर बसवत काही प्रमाणात दहीहंडी साजरी देखील झाली पण त्यावर टीपण्णी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. राज्यात यात्रा (Yatra) आणि दहीहंडी सेलिब्रेशन (Dahi Handi Celebration) दरम्यान सामान्यांचा जीव 'पणाला' लावला जात आहे हे दुर्दैवी असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान आज एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये संबोधताना मुख्यमंत्र्यांनी कोविड 19 नियमावली धाब्यावर बसवणार्या राजकीय पक्षांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडूनच आगामी तिसर्या लाटेचा धोका पाहता राज्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध घालावेत अशा सूचना केल्याचं म्हटलं आहे. आंदोलनकर्त्यांना हे पत्र दाखवलं पाहिजे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. (नक्की वाचा: Raj Thackeray चा राज्य सरकार वर हल्लाबोल; मंदिरं उघडा अन्यथा घंटनाद आंदोलनाचा इशारा).
ANI Tweet
आज मनसेने दहीहंडी सेलिब्रेशन केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मनसैनिकांचं कौतुक करत कोरोनाच्या लाट्या सांगत केवळ भीती पसरवली जात आहे असं म्हटलं आहे. 'लॉकडाऊन आवडे सरकारला' अशी परिस्थिती असल्याचं सांगत राज्य सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला होता. तर मनसे आणि भाजपा राज्यात मंदिरं उघडावीत म्हणून आंदोलनकर्त्याच्या भूमिकेतही आहेत. भाजपाने कालच घंटानाद आंदोलन केले असून मनसे येत्या काही दिवसांत जर सरकारने मंदिरं उघडली नाहीत तर ते आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.