राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचारबंदी, लॉकडाऊन यांचे काटेकोरपणे पालन होत आहे. मात्र तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच राज्यात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनबाबत (Lockdowon) चर्चा सुरु आहे. आता मा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मंगळवार, 13 एप्रिल 2021 रोजी, रात्री 8.30 वाजता राज्याला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री कदाचित लॉकडाऊनबाबत काही महत्वाची घोषणा करू शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री आपल्या आजच्या संबोधनात महाराष्ट्रासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी शकतील, असा विश्वास आहे. मंत्री अस्लम शेख यांच्या म्हणण्यानुसार त्वरित लॉकडाऊन लागू केले जाणार नाही. यासह कोरोनाचा संसर्ग पाहता रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. मात्र तरी आज मुख्यमंत्री नक्की काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपण ट्वीटर, फेसबुक, युट्यूब अशा सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून होणार आहे. तुम्ही खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे भाषण थेट पाहू शकता.
फेसबुक - https://www.facebook.com/CMOMaharashtra/
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ
ट्वीटर - https://twitter.com/CMOMaharashtra
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी टास्क फोर्सशी बैठक झाली. या बैठकीत सामील असलेले सर्व सदस्य लॉकडाउनसाठी तयार असले, तरी हे लॉकडाउन किती काळ चालणार याबाबत अनेक मतभेद होते. महाराष्ट्राच्या लॉकडाऊन मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी सांगितले की, येत्या 2-3 दिवसांत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लॉकडाऊन लागू करणे, असे ते म्हणाले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, लॉकडाऊन जाहीर केल्यास ते मागील वर्षाइतके कडक होणार नाही. नवीन एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वे बुधवारपासून लागू होतील. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई लोकल ट्रेन सेवा वापरण्यास सर्वसामान्यांना बंदी घालण्याची राज्य सरकारची योजना आहे.