CM Eknath Shinde Visits at Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर, रॅलीसह सभेचं आयोजन
CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

काही दिवसांपूर्वीच शिवसेना (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रा काढली होती. या यात्रेत त्यांची गाजलेली सभा किंवा रॅली म्हणजे औरंगाबादचीचं (Aurangabad). दरम्यान आदित्यंच्या सभेला गर्दी बघता अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता आदित्य ठाकरें पाठोपाठचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान सभेसह, रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये दाखल होतील. तर त्यानंतर ते पैठणच्या (Paithan) दिशेने रवाना होतील. दरम्यान ज्या बिडकीन (Bidkin) गावात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा काढली होती, त्याच बिडकीन गावात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा रॅली निघणार आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाडका जिल्ह्या म्हणल्यास हरकत नाही. कारण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दुसऱ्यांदा औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आजच्या हा दौरा मराठवाड्याच्या (Marathwada) दृटीने महत्वाचा आहे. तसेच या दौऱ्यातून मराठवाड्यासह औरंगाबादकरांना काय मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. राजकीय वर्तुळात आजच्या दौऱ्याची मोठी चर्चा आहे. (हे ही वाचा:- आता जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही; CM Eknath Shinde यांनी प्रशासनाला दिले 'हे' आदेश)

 

मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये (Paithan) होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याचे सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना (CDPO) दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय सभेला गर्दी जमवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची गर्दी करण्यात येत असल्याची टीका दौऱ्या आधीच शिंदे गटावर होत आहे. तरी आजचा सणासुदीच्या सुट्ट्यासह उत्सवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा पहिला दौरा असणार आहे.