Wadar Reservation: वडार समाजाला आरक्षण मिळणार? मुख्यमंत्र्यांची घोषणा
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (Photo Credit : Facebook, Devendra Fadnavis)

Wadar Reservation: वडार समाजाने देशबांधीसाठी खूप मेहनत केली आहे. त्यामुळे वडार समाजालासुद्धा वाऱ्यावर न सोडता त्यांना ही आरक्षण लागू करु अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी आज सोलापूरातील एका कार्यक्रमात केली आहे.

सोलापूरमधील पार्क मैदानावर वडार समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी समाजातील नागरिकांना भाषण देताना त्यांनी वडार समाजाला आरक्षण देऊ त्याचबरोबर वस्त्यांची जागासुद्धा त्यांच्या नावावर करुन देण्याची घोषणा केली आहे.

वडार समाजाने मुख्यमंत्र्यांसमोर विविध समाज आरक्षणासाठी विविध मागण्या केल्या होत्या. या समाजाने प्रामुख्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमानाचे मंदिराची बांधणी आणि एसटी महामंडळामध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.